थोडी सागर निळाई

थोडी सागर निळाई, थोडे शंख नि शिँपले,
कधी चांदणे टिपुर तुझ्या डोळ्यात वाचले,
कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या अंगणात,
स्वप्न पाखरांचा थवा विसावला ओँजळीत...
कधी काळोख भिजला कधी भिजली पहाट,
हुंकारला नदीकाठ कधी हरवली वाट
वा-या पावसाची बाज काळी भासतेच दाट
कधी धूसर धूसर एक वादळाची वाट।

No comments: