Cyber mhani

सायबर म्हणी
१) रिकाम्या मॉनिटरला स्क्रीनसेव्हर फार !!!!!
२) आपलाच किबोर्ड नि आपलाच माऊस !!!!!
३) सेलेरॉन गेले पेंटीयम आले !!!!!
४) विंडोज दाखव नाहीतर इंस्टॉलेशन कर !!!!!
५) उचलला पॉईंटर अन् लावला आयकॉनला !!!!!
६) मॉनिटर आणि सी.पी.यू. यांच्यात चार बोटांचे अंतर असते !!!!!
७) माऊसला मॉनिटर साक्ष !!!!!
८) फोर-एट-सिक्सच्या कळपात सेलेरॉन शहाणा !!!!!
९) लॅपटॉपचे बिर्‍हाड पाठीवर !!!!!
१०) आपला तो "पीसी" दुसर्‍याचं ते "मशीन" !!!!!
११) व्हायरसच्या मनात एंटीव्हायरस !!!!!
१२) स्त्रीचं वय,पुरुषाचा पगार अन् कॉम्प्युटरचा स्पीड विचारू नयेत !!!!!
१३) बडा सी.पी.यू. पोकळ डेटा !!!!!
१४) अडला कॉम्प्युटर यु.पी.एस चे पाय धरी !!!!!
१५) मनी वसे ते मॉनिटरवर दिसे !!!!!
१६) नावडतीचा पी.सी.स्लो !!!!!
१७) हार्डडिस्क सलामत तो सॉफ्टवेअर पन्नास !!!!!
१८) चार दिवस हार्डडिस्कचे चार दिवस सी.डी.चे !!!!!
१९) (नेट्वर्किंगमध्ये) सेलेरॉनशेजारी पेंटीयम बांधला, स्पीड नाही पण व्हायरस वाढला !!!!!
२०) सीडींचा बाजार, व्हायरसांचा सुकाळ !!!!!
२१) वरून पेंटीयम आतून फोर-एट-सिक्स !!!!!
२२) हार्डडिस्कमध्ये नाही ते फ्लॉपीत कोठून येणार !!!!!
२३) घरोघरी मायक्रोसॉफ्टच्याच विंडो !!!!!
२४) सॉफ्टवेअर नको पण व्हायरस आवर !!!!!
२५) हा मदरबोर्ड नि हा प्रोसेसर !!!!!
२६) मंदाळ डॉट-मॅट्रिक्सला खडखडाट फार !!!!!
२७) यथा ऑपरेटर तथा कॉम्प्युटर !!!!!

No comments: