प्लीज हे जरूर वाचा...

प्लीज हे जरूर वाचा...
**********************
मी घर विकत घेऊ शकतो...
पण त्या घराचे घरपण नाही...

मी घड्याळ विकत घेऊ शकतो...
पण गेलेली वेळ नाही...

मी मोठे पद विकत घेऊ शकतो...
पण आदर नाही...

मी मखमली गादी विकत घेऊ शकतो...
पण शांत झोप नाही...

मी पुस्तक विकत घेऊ शकतो...
पण विद्या नाही...

मी औषधे विकत घेऊ शकतो...
पण चांगले आरोग्य नाही...

मी रक्त विकत घेऊ शकतो...
पण कोमेजून जात असलेले जीवन नाही...

पैसा हेच सर्वस्व नाही

पैसा जरुर कमवा...
पण त्यासाठी आयुष्यातले सुंदर क्षण गमावू नका...

पैश्याची पूजा जरूर करा...
पण पैश्याचे गुलाम बनू नका...

माणसासाठी पैसा बनला आहे...
पैश्यासाठी माणूस नाही... हे नेहमी लक्षात ठेवा...

No comments: