मनापासून हसण्याचे फायदे

मनापासून हसण्याचे फायदे

शरीराचा थकवा, तसेच मनावरचा ताण कमी होतो.
मनाची नकारात्मकता कमी होते.
योग्य प्रमाणात हसण्याने रक्‍ताभिसरण सुधारण्यास मदत मिळते.
रक्‍तदाब कमी असल्यास किंवा नाडीची गती मंद असल्यास वाढू शकते.
दीर्घ श्‍वसनामुळे होणारे फायदे काही प्रमाणात होऊ शकतात.
मनात असलेले दुःख थोड्या वेळासाठी का होईना, पण दूर होते.
शारीरिक वेदनांची तीव्रता काही प्रमाणात कमी होऊ शकते.
सतत चिडचिड होणे, अकारण राग येणे वगैरे भावनांना आळा बसतो.
मनाची उत्साही वृत्ती कायम राहते.
रोगप्रतिकारशक्‍ती चांगली राहते. उदा.- हसण्याने जिवाणू-विषाणूंचा प्रतिकार करणाऱ्या "इम्युनोग्लोबिन ए' या तत्त्वामध्ये वाढ होते, असे आधुनिक संशोधनातून सिद्ध झालेले आहे.

No comments: